कोविड लसीकरण संदर्भात बल्लारपूर भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. कोविड लसीकरण 100% पूर्ण झालेला शहर बल्लारपूर ठरेल असे कार्य करा.- मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार

105

 

दख़ल न्यूज़ भारत: शंकर महाकाली

बल्लारपुर : दिनांक 31 मार्च 2021 रोजी मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोविड लसीकरण 100% पूर्ण झालेला शहर बल्लारपूर ठरेल या संदर्भात नियोजनात्मक बैठक बल्लारपूर भाजपा कार्यालय मध्ये पार पडली.
बल्लारपूर शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन जनतेला कोविड लसीकरण संदर्भात माहिती देणे तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन करून देणे त्याचबरोबर वयोवृद्ध दिव्यांग बांधवांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्याकरिता वाहनांची मदत करणे व कोरोना संदर्भात जनजागृती करणे ही मोहीम भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी राबविणे या विषयावर चर्चा झाली. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते लखन सिंहजी चंदेल, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, ज्येष्ठ नेते निलेश खरबडे, समीर केने, मनीष पांडे, रनंजय सिंह, न.प. उपाध्यक्ष मीनाताई चौधरी, नगरसेवक येलय्या दासरफ, स्वामी रायबरम, नगरसेविका जयश्री ताई मोहूरले, सुवर्णा ताई भटारकर, बुचय्या कंदिवार, मिथलेश पांडे, विशाल शर्मा, शिवाजी चांदेकर, घनश्याम बुरडकर, सतीश कणकम, किशोर मोहूरले, आदित्य शिंगाडे, मोहित डंगोरे, छगन जुलमे, मुन्ना ठाकूर, संजय बाजपेयी, प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी, राजेश कैथवास, मनीष रामील्ला, राजकुमार श्रीवास्तव, पियूष मेश्राम त्याच बरोबर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.