जय भवानी जय शिवाजी जयघोषाने अकोट शिवसेनेच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा

58

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

दि.३१ मार्च रोजी अकोट येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती ) तिथीनुसार साजरी करण्यात आली. अकोट येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे मा. आमदार संजय गावंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आध्य स्मारकाचे हारार्पण करून पूजन व जलाभिषेक मा. मोकाशे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी आरती करून संपूर्ण मतदार संघामधील शिवसैनिकांना शिवजयंती च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला जिल्हा संघटिका सौ, मायाताई म्हैसने,शहरप्रमुख सुनील रंधे,गटनेते मनीष कराळे यांनी सुद्धा पूजन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुणाल कुलट, अमोल पालेकर,सुभाष सुरतने,किरण शेंडे, हर्षला जायले, अक्षय घायल,विजय भारसाकळे, शिवा गोटे, संजय रेळे, पिंटू वानखडे, मुकेश ठोकळ, निलेश गौड, दिपक रेखाते, स्वराज पोटे,दिवाकर भगत, गोपाल कावरे, जितू चंडालिया, पुंडलिक पद्मने, हर्षदा जायले, अनिल जवंजाळ, अंकुश थुटे, विशाल कंटाळे, निखिल राऊत, चेतन कावरे, रोशन गणभोज, रुपेश जांभळे, सागर जांभळे, राम शेंडे, गोविंद चावरे,निलेश मोगरे, श्रीकांत साबळे,संतोष पालेकर, जगदीशसिंग ठाकूर,विठ्ठल रेळे,यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.