Home क्राइम वणी मुकुटबन रोडवरील दोन अपघातात एक गंभीर तर दोन जखमी

वणी मुकुटबन रोडवरील दोन अपघातात एक गंभीर तर दोन जखमी

136

वणी : विशाल ठोबंरे

27 जुलै सोमवार रोजी सायंकाळी 10 वाजताच्या सुमारास वणीतील मुकुटबन रोडवर दुचाकीचे दोन अपघात झाले. या अपघातात एक जण गंभीर तर दोन जखमी झाले आहे. सदर अपघाताची वणी पोलिसात नोंद करण्यात आली असून दोघांना उपचाराकरिता चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असल्याची महिती आहे.
वणी-मुकुटबन रोडवर गणेशपुर जवळील छोरिया ले आऊट जवळ कल्पना मार्बल दुकाना समोर टिप्पर (MH 29 T 1370) उभे होते. रात्री 10 वाजताच्या दरम्यान पंकज गोपाल महाजन (23) व अमित राजू दुबे (22) हे दुचाकीने (MH 29 AF 1387) जात होते. या दुचाकीने उभ्या असलेल्या टिप्परला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले दोघेही गंभीर जखमी झालेत. दोघांच्याही पायाला व डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर पंकज याच्या डोक्याला मार लागला आहे.
प्रत्यक्षदर्शी नुसार डोक्यातून खूप अधिक रक्तस्राव झाला होता. यांना प्राथमिक उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
तर या घटनेच्या एक तासा आधी व तिथून 100 मिटरच्या अंतरावर गणेशपूर जवळ एक अपघात झाला. यात रमेश भाऊराव तलांडे (30) रा. रासा यांनी आपली दुचाकीने (MH29 BN7609 ) उभ्या असलेल्या टिप्परला (MH 29 VE 1393) जोरदार धडक दिली. ही धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनामुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनामुळे व दुसऱ्या बाजूने टिप्पर उभा असल्याने जाण्यास जागा नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात रमेश किरकोळ जखमी झाला आहे.त्याला वणी यथे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Previous articleआकाश विद्यालयतथा कनिष्ट महाविद्यालय मोहझरी ता. आरमोरी निकाल १००%
Next articleइयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षेमध्ये कोजबी गावातून विद्यार्थी ठरले गुणवत्ता व यशाचे मानकरी