मालेवाडा: लोडशेडिंगमुळे जनता त्रस्त

178

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
मालेवाडा हे गाव परिसरातील प्रमुख म्हणून सर्व प्रसिद्ध आहे. हे गाव बर्‍यापैकी स्वयंपूर्ण असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील जनता या गावावर अवलंबून असते. परंतु येथील नागरिकांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्या भेडसावत असतात. यापैकी विविध सदस्यांपैकी लोड शेडींग ज्वलंत समस्या बनलेली आहे. 24 तासांपैकी तब्बल 8 तास लोड शेडींग असते. आधीच नागरिक तीव्र उन्हाच्या उकाड्याने त्रस्त आहेत. त्यातच भर म्हणून तब्बल आठ तास वीज नसणे ही सध्या मोठी समस्या बनली आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिक खूप हैराण झाले आहेत.
मालेवाडा फिडर अंतर्गत सकाळी 6 ते 8, दुपारी 12 ते 2, सायंकाळी 6 ते 8 व मध्यरात्री 12 ते 2 याप्रमाणे लोडशेडिंगचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. ही समस्या अजून किती दिवस राहणार? याचे समाधानकारक उत्तर कुणाकडेही नाही. मालेवाडा गावात अनेक लोकप्रतिनिधी असून यास समस्येचे निराकरण कधी होणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. मालेवाडा परिसर अति संवेदनशील असून नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे सतत वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात या परिसरात नुकतीच मोठी घटना घडून गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.