मोटेगावात अग्नीतांडव अन… गाव पेटता पेटता थोडक्यात बचावला

440

 

प्रमोद राऊत

मोठेेगाव येथे लागलेल्या भीषण आगीत 4 घरे पूर्णतः जळुन खाक झाले असून, यात लाखो रुपयांची हानी झाली. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळ असलेल्या मोठेगाव येथे आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठेेगाव येथील 4 घरे पूर्णतः जळुन राखरांगोळी झाली. आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण गाव आगीच्या कवेत घेण्याचा जणू ठाण मांडला होता. परन्तु गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात गाव पेटता पेटता बचावले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मोठेगाव येथे आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक आग आग म्हणून गावात एकच कल्लोळ माजला जो तो आग आग म्हणून वाचवा पाणी पाणी घ्या विजवारे म्हणत ओरडू लागले एकाच वेळेस आग लागली. आणि घरे पेटायला सुरवात झाली. यात प्रकाश नेवारे, मंगेश नेवारे, सुधाकर शेंडे, राजू अडसोडे, यांच्या घराला आग लागली होती. काही कळायच्या आत वाऱ्याच्या झुळकीने आगीने संपूर्ण घरे राखरांगोळी होऊन काही क्षणातच खाक झाली. गावातील विलास कोराम यांनी चिमूर येथील अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यामुळं तात्काळ अग्निशमन दल दाखल झाले. गावकरी आणि अग्निशमन यांनी सायंकाळी 5 वाजता पर्यँत आग आटोक्यात आणली. चार घरे पूर्णतः जळून आग पाचव्या बंडू न्हाने यांच्या घराला लागली होती. परन्तु थोडक्यात बंडूचे घर नागरिकांच्या सतर्कतेने बचावले. त्यांचे पाण्याचे पाईप जळुन भसम झाले. या आगीत जळालेलले चार घरे जळुन खाक झाले. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, जीवनापयोगी सर्व साहित्य जळून राखरांगोळी झालेली आहे.
आग ही शेतात वनवा लावला असता, वाऱ्याच्या झुळकीने गावाकडे पेटत आला. अशी गावकऱ्यांनी माहिती दिली. परंतु आग कोनी लावली याचा सुगावा लागला नाही. पोलिसांनी अज्ञात इसमावर मर्ग दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या आगीची माहिती या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार याना माहिती होताच त्यांनी प्रशासकीय यंत्रणा ला माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीची माहिती घेऊन मदतकार्यचे आदेश दिले. सदर घटनेची माहिती होताच उपविभागीय अधिकारी संकपाळ, तहसीलदार नागटीळक, संवर्ग विकास अधिकारी पुरी, विस्तार अधिकारी गुंतीवर, विलासजी डांगे माजी जी. प. सदस्य, चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे, व पोलीस पथक, वनविभागाचे अधिकारी, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, मोठेगाव चे सरपंच सुभाष नेवारे, उपसरपंच चंदू रामटेके, मोठेेगावचे तलाठी कांबळे, ग्रामसेवक वाघमारे मॅडम, विलास कोराम, संदीप पिसे, यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीत नुकसानग्रस्त घराची पाहणी करून तात्काळ पंचनामा करून मदत देण्याचे यावेळी आश्वासन दिले.