दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपींना सेवेतून कायम काढून कारवाई करावी. वनखात्याच्या कर्मचाऱ्याने दिले तहसीलदाराला निवेदन.

108

उपसंपादक अशोक खंडारे/प्रतिनिधी प्रविण तिवाडे
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळे दिपाली चव्हाण ह्या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केली तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवेतुन कायमचे बडतर्फ करून शिक्षा करावी अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी कुरखेडा व पुराडा यांनी तहसीलदार कुरखेडा यांना निवेदन देऊन केली आहे.
उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दिपाली चव्हाण हरीसाल मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी दिनांक २५/३/२०२१ ला आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या विनोद शिवकुमार याला व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याना सेवेतून कायम काढून टाकावे तसेच धारनी पोलीस स्टेशनचा तपास एसआयटी कडे सोपविण्यात यावा हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी व दिपाली चव्हाण ह्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला पाच कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी तहसीलदार कुरखेडा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी बि. एच. डिघोळे,क्षेत्र सहाय्यक एस. एल. शेंडे, क्षेत्र सहाय्यक एम. एल. किनेकर, क्षेत्र सहाय्यक भूषण खंडाते, वनरक्षक के. एम. खोब्रागडे, वनरक्षक सुनीता लेखामी, नितुपाल नाकाडे, अतुल गांगरेट्टीवार, वनपाल हेमंत झोडगे, वनपाल सालोटकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.