आझाद हिंद विकास संस्था रत्नागिरी येथे जिल्ह्यातील एकमेव कृषी निविष्ठा पदविके चे (देसी) या अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू.

54

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे कृषी पदवी, पदविका शैक्षणिक अहर्ता नाही त्यासाठी आझाद हिंद विकास संस्थेमार्फत जिल्ह्यास एका वर्गात मंजुरी मिळाली आहे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने हैदराबाद येथील राष्ट्रिय कृषि विस्तार प्रबंधन संस्थेमार्फत (मॅनेज) एक वर्ष अभ्यासक्रम सुरू केला आहे .जिल्हास्तरावर समन्वयक म्हणून प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी यांना प्राधिकृत केले आहे. तसेच राज्य स्तरावर वनामती नागपूर आहे कृषी निविष्ठा विक्रेते हे कृषी विस्तारक म्हणून काम करत असल्याने रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वापराबद्दल त्यांचे ज्ञान अद्यावत करणे हा मुख्य उद्देश आहे म्हणून या अभ्यासक्रमा ची रचना करण्यात आली आहे
या अभ्यासक्रमाचे उद्घाटन प्रसंगी माननीय श्री शिवराज घोरपडे साहेब (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी) त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे श्रीम उर्मिला चिखले मॅडम (प्रकल्प उपसंचालक आत्मा १) व माननीय श्री गोरक्षनाथ मुरकुटे साहेब जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील चाळीस कृषी सेवा केंद्र व सहकारी सोसायटी यांचे विक्रेते यावेळी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे .अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .देसी अभ्यासक्रमाचे फॅसिलेटर म्हणून माननीय श्री विनय चव्हाण सर अध्यक्ष आझाद हिंद विकास संस्था यांनी प्रशिक्षणार्थींना सर्व कोर्स बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमावेळी संस्थेचे सल्लागार मंडळ अध्यक्ष माननीय बाबासाहेब चव्हाण सर ,खजिनदार तथा कार्याध्यक्ष विशाल ढोकळे ,संस्थेचे सदस्य, माननीय नितीन चव्हाण डॉक्टर नम्रता उरुणकर आदी उपस्थित होते

दखल न्यूज भारत