हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी
मोहझरी :-
आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी ता.आरमोरी एस.एस.सी. परीक्षेचा मार्च २०२० चा निकाल १००% लागलेला असून प्राविण्य श्रेणीत 04 ,प्रथम श्रेणीत 18 व द्वितीय श्रेणीत 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तसेच शाळेतून प्रथम क्रमांक साहिल रमेश लोणबले 90.40 % ,द्वितीय क्रमांक कु. नगीना हिवराज बागडे 79.00% आणि तृतीय क्रमांक नयन सुभाष मोहुर्ले 77 % व चतुर्थ क्रमांक दुर्योधन सुकरु निकोडे 75.80 % यांनी पटकाविला .
सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक डॉ.रामकृष्णजी मडावी माजी आमदार ,प्राचार्य व्ही.एम. झोळेे, श्री एच.पी. पारधी, श्री व्ही.के. बोरकर, श्री ए.बी. तुपटे, श्री एस.के. गजबे, श्री डी.एस. मडावी, श्री.यू.एस. गेडाम, प्रा.एस.के. बोरकर, पी.के.पी.पी.वाकुडकर, प्रा.श्री.पी.एस. वालडे, श्री. केएम बनकर, श्री. पीएम खोब्रागडे, श्री. टी वाय चौधरी, श्री. आर पी नखाते, श्री. मेश्राम आणि सर्व प्राध्यापक व अध्यापक कर्मचार्यांनी आकाश विद्यालय मोहझरी येथील साहिल रमेश लोणबले ,कु. नगीना हिवराज बागडे,नयन सुभाष मोहुर्ले व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले