मोक्षधाम हाणामारी प्रकरन पूर्व वैमनस्यातून , वणीत हाणामारी च्या घटनेत वाढ

60

 

वणी : परशुराम पोटे

शहरात २० ते २२ वर्षे वयोगटांतील तरुणांचा गट निर्माण झाला असुन काही ना काही कारणावरून शहरात हाणामारी, मारामाऱ्या सुरुच असतात,गांधी चौकातील मारामारी, दिपक चौपाटी परीसरातील बियर बार जवळील मारामारी तर गंगा विहार मध्ये वास्तव्यास असलेल्या एका वकीलास मारहान अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक मारामारीची घटना सेवा नगर परिसरातील युवकांत आणि रंगनाथन नगर परिसरातील युवकांत कांही दिवसा अगोदर घडली होती. परंतु दोनही गटाकडील सदस्यांनी जत्रा मैदानात एकत्र येऊन प्रकरण आपसी मिटविण्यात आले होते. दरम्यान मंगळावारी रंगपंचमीच्या दिवशी अंत्यविधीच्या निमीत्ताने मोक्षधाम येथे आलेल्या दोनही गटाकडील सदस्य एकमेकांसमोर आल्याने वाद निर्माण झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
सविस्तर असे की, रंगनाथ नगर येथील आजारी असलेली व्यक्ती रविवारी दि. २८ मार्चला मृत्यूमुखी पडल्यानंतर त्या महिलेचा अंत्यविधी सोहळा सोमवारी २९ मार्चला करण्याचे ठरले. अंतयात्रा मोक्षधाम येथे पोहचल्यानंतर त्याठिकाणी अंत्यविधी सुरु असतांना सेवानगर व अंत्यविधीत सहभागी झालेल्या रंगनाथ नगर येथील युवकांमध्ये जुन्या वैमनस्यातून परत वाद चिघळला व दोन्ही गट आमने सामने आल्याने त्यांच्यात जबर हाणामारी सुरु झाली. लाठ्या काठ्या व दगड गोट्यांनी एकमेकांवर हल्ले चढविण्यात आले. एवढेच नाही तर सरणाच्या लाकडांनीही एकमेकांना मारण्यात आले. यावेळी मोक्षधाम येथे काम करणारा मजूर कैलास रामेश्वर नवघरे (३५) रा.रामपूरा वार्ड हा अंत्यविधीसाठी बांबुची सिडी तयार करत असतांना काही युवक त्याच्या जवळ आले आणि अंत्यविधीसाठी तयार करण्यात आलेल्या सिडीचे बांबु हिसकावू लागले,यावेळी नवघरे यानी मनाई केेली असता त्यालाच जख्मी त्या मजुरालाच मारहान केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अंत्यविधीत राडा करण्याऱ्या काही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले. तर काही आरोपींना माहितीच्या आधारावरून अटक करून पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी एकूण १६ आरोपींना अटक केली आहे. कैलास नवघरे यांच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शिवम संजय बिसमोरे (२२), रितीक अनिल बिसमोरे (१९), अनिकेत मोगरे, अंकुश मोगरे, अभिषेक ताराचंद, रोहित पांडे, प्रितम ठावरी, रितेश तोमस्कर, मारोती पेडावार, आकाश दारुंडे, चंदू संजय बिसमोरे सर्व रा. सेवानगर तर स्वप्निल राऊत, चेतन राऊत, ईश्वर देठे, निलेश पाटील, बबलू चुराणकर सर्व रा. रंगनाथ नगर यांचा समावेश असून त्यांच्यावर भांदंविच्या कलम १४७, १४८, १४९, १८८, २६९, २४९, ३२४, ३२३, ४२७, ५०६ तसेच सहकलम १३५ मुपोका R/W साथ रोग सन १८९७ चे कलम २ व ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.