जेष्टसमाजसेवीका श्रीमती मालती मावळे यांचे दुःखद निधन.

54

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे- जेष्ठसमाजसेविका श्रीमती मालती शिवाजीराव मावळे यांचे वयाचे 77 वर्षी कोव्हिडं मुळे दि.29 मार्च 2021रोजी सकाळी 6 30 वाजता ओ एन पी हॉस्पिटल , शिवाजीनगर येथे दुःखद निधन आले.
त्यांचे मागे दोन मुले शिरीष,संदीप मावळे 2 सुना , एक मुलगी सौ.सुप्रिया काटे, जावई रमेश काटे ,नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.
कै. शिवाजीराव मावळे शिवसेनेचे पहिले नगरसेवक आणि कॉंग्रेसचे नगरसेवक, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष यांच्या त्या पत्नी होत्या. त्यामुळे त्यांचे घरी कायमच कार्यकर्ते, मान्यवर मंडळींचा राबता होता . कायम हसतमुख सर्वांचे आदराने, आपुलकीने स्वागत, गर्जुना मदत , मार्गदर्शन करीत असे.
पुणे सदाशिव पेठेत मावळे परिवाराने सामाजिक कार्यात मोठा नावलौकिक मिळविला असून त्यांचे आदर्शाने , मार्गदर्शनाने अनेक कार्यकर्ते राजकारणात तयार झालेत,तसेच सामाजिक कार्यात मानसपुत्र सत्यशोधक रघुनाथ ढोक त्यांचे पाऊलावर कार्यरत आहेत ते केवळ या माऊली मुळेच.अशी माय माऊली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.