सत तुकाराम महाराज बीज साजरी.

47

 

कन्हान : – संत तुकाराम नगर कन्हान येथे संत तुका राम महाराज यांची बीज कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित छोटेखानी कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.३०) मार्च ला संत तुकाराम नगर कन्हान येथील संत तुकाराम महाराज मंदीरात संत तुकाराम महिला भजन मंडळा व्दारे मंदीरातील संत तुकाराम महाराज व सर्व मुर्तीस पुष्पहार अर्पण करून छोटेखानी कार्यक्रमाची सुरूवात करून भजन, आरती व दहीकाला प्रसाद वितरण करण्यात आला. मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शांताराम जळते, ताराचंद निंबा ळकर, मोतीराम रहाटे, सुनिता ईखार हयानी संत तुका राम महाराज च्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांचा जय घोष करित अभिवादन करू न कोरोना नियमाचे पालन करित संत तुकाराम महारा ज बीज साजरी केली. कार्यक्रमास प्रमिला मते, लक्ष्मी गडे, पुष्पा खर्चे, लता मोंडे, लता मेहेर, डोणारकर काकु, रेवतकर काकु आदीने सहकार्य केले.