सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हलगर्जी मुळे अनेक कामगार शासकीय योजनेच्या लाभा पासून वंचित.

128

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे)

माहूर तालुक्यातील नोंदणीकृत अनेक कामगार नांदेड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या हलगर्जी मुळे कोविड 19 रीलीफ फंड,शैक्षणीक योजना,आरोग्य योजना,आर्थिक सहाय्यता योजना,सामाजिक सुरक्षा योजनेसह कामगारांच्या नातेवाईकांना अंतिम विधीचे 10,000 रुपये व गेल्या दोन वर्षात पेन्शन मिळाले नसल्याची तक्रार बांधकाम कामगार महासंघाने तहसीलदार माहूर यांचे माध्यमांतून आज दि.29 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली आहे.
बांधकाम कामगार महासंघाचे वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीत महाराष्ट्र ईमारत व कामगार कल्याण मंडळात 95 कोटी रुपये पडून असतानाही सदर कार्यालयाच्या हराकिरीमुळे खाते क्रमांक एकाचा नाव मात्र दुसऱ्याचे असला प्रकार अनेक प्रकरणात झाल्याने पात्र असतानाही लाभ धारकाला शासकीय योजनेचा फायदा होत नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.सरकार कोणतेही असो योजनांचा फक्त बोभाटाच केल्या जातो असा आरोपही त्यात करण्यात आला आहे.लॉक डाऊनमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येण्यास त्या कार्यालयाचा हलगर्जी पणाच कारणीभूत असल्याने चौकशी करून कामगारांना न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.त्यावर महासंघाचे जिल्हा सचिव संजय श्रीराम सूरोशे यांचेसह अनीसखाँ आजादखाँ,संजय तोळाराम राठोड व गजानन मुकटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.त्याच्या प्रती सर्वसंबंधिताना पाठविण्यात आल्या आहेत.