रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु येथे विद्यार्थ्यांसाठी युद्धकला प्रशिक्षण आणि सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम

68

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रायगड:- रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु येथील सर्व विद्यार्थ्यांसाठी दिनांक २६/०३/२१ पासून मर्दानी खेळ ( शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर ) सुरू करण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम देखील आपल्या धैर्य सामाजिक संस्थेमार्फत राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ किरण ढवळे उपाध्यक्ष श्री सखाराम वारे, मुख्याध्यापक श्री सोपान चांदे , उपशिक्षिका श्रीमती वंदना सकटे, उपशिक्षक श्री पोपट काळे, उपशिक्षिका श्रीम. अरुणा कराडे उपस्थित होते.
आजच्या काळात लोप पावत चाललेल्या प्राचीन युद्धकलेचे प्रशिक्षण हे स्वसंरक्षणासाठी तसेच शारीरिक दृष्ट्या उपयुक्त असा हा उपक्रम असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी धैर्य सामाजिक संस्थेमार्फत तालुक्यात कित्येक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे .

*दखल न्यूज भारत*