डॉ.आंबेडकर विद्यालय आरमोरी चे सुयश। विद्यालयाचा निकाल 95.70%

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी दि 29 जुलै :- प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. शाळेच्या निकालाची टक्केवारी 95.70 टक्के आहे. येथील एस. एस. सी. मार्च 2020 च्या परीक्षेला एकूण 163 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात 156 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले,प्राविण्य श्रेणीत 40 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 62 तर द्वितीय श्रेणीत 45 तसेच पास श्रेणीत नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात गुणानुक्रमे कुमारी मिथाली कैलास गेडाम ही 96% गुण घेऊन प्रथम आली, द्वितीय रोहित वासुदेव निखारे 95.20 टक्के व तृतीय कुमारी तनवी प्रकाश ठाकरे हिला 94.40 टक्के प्राप्त झाले. कुमारी वेदांती भास्कर बोडणे 94.20 ,अमन अजय गजभिये 94% ,कुमारी कांती प्रभाकर आंबोरकर 93.80 टक्के, सोयल भिमराव मेश्राम 93.20 टक्के, कु. कृष्णाई रामचंद्र गेडाम 92.60 टक्के, कुमारी ऐश्वर्या चेतराम म्हस्के 90 टक्के गुण घेऊन सुयश प्राप्त केले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मदनराव मेश्राम तसेच आणि संस्था सचिव एडवोकेट प्रशांत मेश्राम विद्यालयाचे प्राचार्य व्ही. जी. शेंडे पर्यवेक्षक एस.के. वासनिक तसेच बांबोडे, बडोले, खोब्रागडे, दुरबुडे तसेच वरिष्ठ लिपिक सोमनकर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.