कसबेगव्हान येथील जुगारावर पोलिसांची धाड, दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात, खल्लार पोलिसांची कारवाई

262

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
खल्लार पो स्टे हद्दीतील कसबेगव्हान येथे रंगपंचमीच्या दिवशी खेळल्या जात असलेल्या जुगारावर खल्लार पोलिसांनी धाड टाकली त्यात दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे
काल दि 29 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी कसबेगव्हान येथे स्मशानभूमीच्या मागे भुलेश्वरी नदीच्याकाठी कसबेगव्हान येथील काही जुगार शौकिन हे दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास झुडुपाआड जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली
त्यामाहितीनुसार खल्लारचे ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ अशोक सावरकर, अनिल बेलसरे, शाकिर शेख, अविनाश ठाकरे सैनिक अक्षय दाभाडे, गोपाल माहोरे हे जुगार पकडण्यासाठी लपुन जात होते पोलिसांची चाहूल लागतातच जुगार खेळत असलेल्यापैकी काही जुगारी पळून गेले तर रोशन बाबाराव गणेशपुरे वय 27 व मिलिंद सुरेश दामले वय 22 हे दोघेजण पोलिसांच्या हाती सापडले
जुगार खेळत असलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी यामाहा कंपनीची MH27,TC1177 व बजाज कंपनीची विना नंबरची पल्सर दुचाकी व रोख असा एकूण 2 लाख 1650 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जुगार खेळणाऱ्याविरुध्द मुजुका 12(अ)नुसार गुन्हा दाखल केला आहे