आरोपींना कठोर शासन करून पीडितेला न्याय द्यावा – उमाताई खापरे

258

 

पुणे दि.30 : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपीने तिच्या छातीवर गोळी झाडली. मात्र छातीत मोबाईल ठेवल्याने यातून ती बचावली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि जीवघेणा हल्ला प्रकरणी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमाताई खापरे, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चनाताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव वर्षाताई डहाळे, प्रदेश कोषाध्यक्ष महिला मोर्चा शैलाताई मोळक आणि पर्वती महिला आघाडी अध्यक्षा विनया बहुलीकर यांच्या पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करून पीडितेला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी नगरसेवक आनंद रिठे, नगरसेवक महेश वाबळे, पर्वती चे संघटन सरचिटणीस प्रशांत दिवेकर, पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस आशाताई बिबवे, रेशमाताई सय्यद, गायत्रीताई भागवत, पर्वती महिला आघाडीच्या संध्याताई नांदे, सारिका ठाकर, रेणुका पाठक, जान्हवी देशपांडें, साधना काळे, रुपाली महामुनी या पदाधिकारी उपस्थित होत्या .