धुळवडीला कुत्रा चावला नंतर टायर फुटला युवकाचा जीव गेला … १ गंभीर जखमी

230

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापुर अमरावती मार्गावरील दुर्घटना

धुळवडीच्या दिवशी मित्रासोबत रंग खेळताना कुत्रा चावला रेबीज प्रतिबंधक लस घेण्याकरीता मित्रासह दर्यापुर येथील दोन युवक दुचाकीने अमरावती येथे जात असताना भरघाव दुचाकीचा समोरचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात काळाने घाला घातला. एक घटनास्थळी मृृृत तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मृतक प्रशांत रामदास आखरे हा ३० वर्षीय युवक धुळवडीला रविवारी मित्रासमवेत रंग खेळत असता अचानक कुत्र्याने चावा घेतला. ताबडतोब रेबीज प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असल्याने आपला मित्र अनुप विनायक कुलट सोबत सोमवारी सांयकाळी ८ वा अमरावती येथे निघाले. दर्यापुर अमरावती मार्गावरील लखापुर फाट्यानजीक भरघाव दुचाकीचा समोरील टायर फुटल्याने दोघेही खाली पडले यात प्रशांत रामदास आखरे घटनास्थळी मृत झाला व अनुप विनायक कुलट ह्यास गंभीर जखमी झाल्याने दर्यापुर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले.सदर्हु जखमी गंभीर असल्याने पुढील उपचारा करीता अमरावती येथे दाखल करण्यात आले. दर्यापुर पोलीसानी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असुन पुढील तपास करत आहे.
मृृृतकासह गंभीर जखमीस उपचाराकरीता रुग्णवाहीकेस पाचारण करत मोलाची भुमीका पत्रकार किरण होले यानी केली.