कांन्द्री येथे एका युवका ला पोटावर चाकु मारुन केले जख्मी कन्हान पोलीसांनी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला

84

 

पारशिवनी ता लुका प्रत्तिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान(ता प्र):- कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या कांन्द्री ग्राम पंचायती चे वार्ड नंबर ०४ शिवनगर येथे चार आरोपींनी फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी याचा मित्राला पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
कन्हान पोलीसांन कडून मिळालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २९ मार्च २०२१ ला धुलिवंदन (होळी) च्या दिवशी दुपारी २:३० ते ३:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी वय १९ वर्ष राहणार वार्ड नंबर चार शिवनगर कांन्द्री व त्याचा मित्र हे आपल्या राहते घराच्या समोर होळी सणा निमित्य असतांना यातील
आरोपी १) फ्रॅंक अंथ्थोनी राहणार हनुमान नगर कांन्द्री ,
२) अजय चौहान राहणार कांन्द्री ३) सुरेंन्द्र कुलदीप राहणार अशोक नगर कन्हान
४)रायलँ चाफले राहणार कांद्री.
हे आले व म्हटले कि यहा दारु काहा मिलती है तर फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी ने म्हटले कि दारु यहा मिलती नहीं मुझे पता नहीं असे म्हटले तर आरोपी सुरेंन्द्र कुलदीप राहणार अशोक नगर कन्हान याने म्हटले कि अशालिल भाषा चा वापर करून म्हटले की तुमको मालूम नही क्या दारु काहा मिलती है असे म्हणून फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी व त्याचा मित्राला धक्का-बुक्की करुन मारपीट केली व आरोपी फ्रॅंक अंथ्थोनी , अजय चौहान , व राॅयल चाफले हे आले तर त्यांनी सुद्धा फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी व त्याचा मित्राला मारपीट करुन आरोपी अजय चौहान राहणार कांन्द्री याने फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी याचा मित्राला पोटावर चाकु मारुन गंभीर जख्मी केले . कन्हान पोलीसांनी फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी यांचा तोडी तक्रारी वरुन गुन्हा नोंद करून चार ही आरोपी च्या विरुद्ध कलम २९४,३०७ , ३४ भा.द.वी चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस उप निरिक्षक पुढील तपास करीत आहे .