पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचाराची घटना; १० जणांचा मृत्यू

114

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच बांगलादेश दौरा केला. याविरोधात तेथील काही कट्टर पंथीय मुस्लिम संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून यामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर असताना त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु झाली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. या घटनेत आतापर्यंत १० आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी बांगलादेशमधील एका कट्टर मुस्लिम संघटनेने हिंदू मंदिर आणि ट्रेनवर हल्ला करत त्यांची तोडफोड केली आहे. तर अनेक सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.
दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाक्‍यातही निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबराच्या गोळ्याही चालवल्या. त्यामध्ये काही जण जखमी झाले.