मथुराबाई मोतीलाल पाटील यांचे निधन

0
154

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि. २९ : माजी सरपंच मोतीलाल जुलाल पाटील यांच्या पत्नी व संध्या यशवंत चव्हाण यांच्या मातोश्री मथुराबाई मोतीलाल पाटील यांचे २८ जुलै रोजी दूपारी २ वाजता कोरोनामूळे निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. जळगाव जिल्ह्यातील देवगाव देवळी येथील त्या रहिवासी होत्या. नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अतिशय शांत, संयमी स्वभाव व नेहमी सर्वांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मूली, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा कांतीलाल हा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात अभियंता तर दुसरा मुलगा प्रा. डॉ. हिरालाल पाटील हे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचे जावई शरद बोरसे हे सार्वजनिक बांधकाम विभागातुन सेवानिवृत्त झालेले आहेत, यशवंत चव्हाण हे मुंबई महापालिकेत शिक्षक आहेत. तर जगन्नाथ बाविस्कर हे धुळे येथे शेती करत आहेत.