वेतन पथक कार्यालयातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता सहकार्य करा- आमदार नागो गाणार

172

 

ऋषी सहारे
संपादक

मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डी सी पी एस खाते, एन पी एबस खात्यामध्ये समाविष्ट करण्याबाबतच्या कामासाठी वेतन पथक कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी प्रत्येकी 2000 रुपये मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाले आहे या प्रकरणी शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर व जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांचेकडे तक्रारीची दखल घेऊन संबंधितांना निलंबित करण्याबाबतची मागणी केली आहे, त्यामुळे डी सी पी एस खाते, एन पी एस खात्यामध्ये समाविष्ट करण्याच्या कामासाठी कोणालाही पैसे देण्यात येऊ नये तसेच पैसे मागणार याचे नाव मला मोबाईल द्वारे कळविण्यात यावे या प्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी सहकार्य करावे असे आमदार नागो गाणार यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.