भाजपा अकोट शहर अध्यक्षपदी कनक कोटक

52

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

भारतीय जनता पार्टीच्या अकोट शहर अध्यक्षपदी कनक कोटक यांची फेरनिवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे,जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात,आमदार प्रकाश भारसाकळे, सरचिटणीस माधवराव मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या मध्ये कनक कोटक यांनी पक्षबांधणी करीता केलेले कार्याची दखल घेत फेरनियुक्ती करण्यात आली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सरचिटणीस व कार्यकारिणी सदस्यांची,विशेष आमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आल्याची माहीती प्रसिद्धी प्रमुख मंगेश लोणकर यांनी दिली.