विराट प्रतिष्ठान गजानन नगर मध्ये होळी मध्ये करोना विषाणूचा दहन

46

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट शहरातील विराट प्रतिष्ठान गजानन नगर मध्ये होळी मध्ये करोना विषाणू सारखी दिसणारी एक कलाकृती करून तिला होलिकेच्या सर्वात वर ठेऊन होळी जाळली. संपूर्ण देशाला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रस्त करणाऱ्या ह्या महाघातक विषाणूचा नायनाट होलिका मातेने करावा असे साकळे देखील ह्यावेळी घातले. कोरोना विषाणूची होळी करण्यासाठी हिंदू परंपरे नुसार समाजातील अज्ञान, दृष्ट विचार, अंधविश्वास, असामाजिक परंपरा व रूढी ह्यांना होळीत टाकून जळण्याची परंपरा आहे. होलिका माता आपल्या सोबत
आमंगल घेऊन जाते आणि समाजाला
मंगल करते अशी आध्यात्मिका
आहे. त्याच पार्शभूमी वर देशाच्या
सुव्यवस्थेला कीड लावणारा कोरोना ह्या होळीत जळून जावा ह्या साठी होलिका दहणात कोरोनाला देखील दहन केले असल्याचे विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल ऊर्फ गोलू भगत यांनी सांगितले. ह्या वेळी त्यांनी सर्वाना होळीच्या शुभेच्छा दिल्या.