चिमूर पोलीस स्टेशन मध्ये खुली व्यायाम शाळेचे उदघाटन दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये पेटविली होळी

124

 

प्रमोद राऊत दखल न्यूज भारत

चिमूर पोलीस स्टेशन मध्ये खुली व्यायाम शाळेचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे हस्ते संपन्न झाले असून या प्रसंगी सहा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित होते

चिमूर येथे तरुणांना व्यायाम करण्यासाठी सुसज्य व्यायाम शाळा नसल्याने तरुणांना शारीरिक व्यायाम साठी अडचण निर्माण होत होती तेव्हा चिमूर पोलीस उपविभागीय अधिकारी पदी असलेले सहा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सामाजिक कार्याकडे कल देत चिमूर पोलीस स्टेशन मध्ये खुली व्यायाम शाळा ओपन केली असून
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले

यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे, पीएसआय मोहोड, पीएसआय अलाम शेख, पीएसआय गायकवाड सहित
सामाजिक युवा कार्यकर्ते श्रेयस लाखे,अमित जुमडे, पत्रकार वर्ग ,पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे परिवार उपस्थित होते

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते होळी दहन करण्यात आले