पिंपरी चिंचवड मध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून घेत राहत्या घरी आत्महत्या!

267

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्न (वय- वर्ष २१) याने होळीच्या दिवशी रविवारी रात्री राहत्या घराच्या गच्चीवर आपल्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण समजू अद्याप समजू शकले नाही. पोलिस तपास करत आहेत. या घटनेनंतर प्रसन्नला जवळच आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं.

या घटनेमुळे चिंचवड वाल्हेकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. चौपाटी चौकात चिंचवडे यांचा बंगला आहे. करुणा चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. सर्वांनी रात्रीचे एकत्र जेवण केले आणि त्यानंतर प्रसन्न वरच्या मजल्यावर गेला. साडेनऊ च्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, रुग्णालयातही मोठ्या संख्येने नगरसेवक आणि नागरिकांनी गर्दी केली होती.