संभाजी ब्रिगेडच्या विभागीय पदाधिकारी निवडी जाहीर

45

 

पुणे/सदाशिव पोरे- मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेडच्या पुणे विभागीय पदाधिकारी निवडी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड , प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे , प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले, यांच्या मार्गदर्शनखाली व प्रदेश संघटक प्रदिप कणसे , पुणे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदुम यांच्या प्रमुख ऊपस्थितीत तसेच पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत , पुणे ऊत्तरचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे यांच्या विशेष ऊपस्थितीत नुकत्याच करण्यात आल्या. दि. २८ मार्च रोजी पुणे विभाग कार्यकारिणी आढावा बैठक व नुतन निवडी जांभुळवाडी येथे कोरोनाची नियमावली पाळुन ५० लोकांच्या ऊपस्थितीत करण्यात आल्या.
यावेळी प्रदीप बेलदरे पाटील- पुणे विभागीय अध्यक्ष (पुणे/सातारा), दिपक वाडदेकर-पुणे विभागीय अध्यक्ष (सोलापूर, सांगली, कोल्हापूर), प्रशांत धुमाळ – संभाजी ब्रिगेड भोर तालुकाध्यक्ष,शंभूराजे ढवळे- पुणे शहर कार्याध्यक्ष, शुभम पठारे – संभाजी ब्रिगेड वडगावशेरी मतदार संघ अध्यक्ष अशा निवडी करण्यात आल्या.
सदर प्रसंगी विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडले, कार्यकर्त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध शासकीय योजना, व्यवसायातील संधी, शेती व्यवसाय व जोडधंदे, मराठा आरक्षण या विषयावर चर्चा करण्यात आली.
संघटनेची ध्येय व धोरणे , विचार तळागाळात पोचवण्याबरोबरच वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन नुतन पदाधिकाऱ्यांनी दिलं. यावेळी पुणे शहरासह जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते ऊपस्थित होते. नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.