शहर वाहतूक शाखा अकोला च्या सतर्कतेने विद्यार्थ्याला परत मिळाली मोटारसायकल

125

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी मोटारसायकल ने खामगाव वरून दि. २१ मार्च रोजी अकोला येथे आलेल्या विद्यार्थ्यांची चोरी झालेली मोटारसायकल शहर वाहतूक शाखेतील पोलीस अमलदारांचे सातर्कतेने त्याला परत मिळाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला,सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे‌.की खामगाव येथील पुरवार गल्ली ,दत्त मंदिर जवळ खामगाव जिल्हा बुलडाणा हा विद्यार्थी ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी दि.२१ मार्च रोजी अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात आला असता त्याने त्याची मोटारसायकल CB युनिकोर्ण क्र MH २८ AH ७८७७ पार्क करून परीक्षा संपल्यानंतर ५:०० वा परत आला असता त्याला मोटारसायकल दिसून आली नाही, कोणीतरी चुकीने घेऊन गेला असेल असे समजून त्याने आजूबाजूला शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे त्याने पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे लेखी तक्रार दिली असता तक्रार नोंदवून रामदास पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार ह्यांनी शोध सुरू केला, दरम्यान आज दि.२८ मार्च रोजी स्थानिक वाशिम बायपास चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार शेख फराज शेख सरफराज हे कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना एक मोटारसायकल स्वार येतांना दिसला, कागदपत्रे चेक करण्यासाठी त्याची मोटारसायकल त्याने हळू केली व कागदपत्रे जवळ नसल्याने न थांबता तसाच पुढे मोटारसायकल वेगाने पळविली, वाहतूक पोलिसाला संशय आल्याने त्यांनी सदर मोटारसायकल स्वार ह्याचा पाठलाग केला असता त्याने सदर मोटारसायकल सरकारी बगीचा जवळ सोडून पळून गेले, सदरची मोटारसायकल वाहतूक कार्यालयात लावून ही माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना दिली असता त्यांनी शोध घेतला असता वरील माहिती मिळाल्याने मोटारसायकल चा मूळ मालक सागर पाटील ह्याला मोबाईल फोन द्वारे दिली असता ते त्वरेने अकोला येथे येऊन वाहतूक कार्यालयात आले असता, रामदास पेठ पोलीस स्टेशनला सदर माहिती देण्यात येऊन मोटारसायकल त्यांचे ताब्यात देण्यात आली तेव्हा त्यांनी शेख फराज ह्यांचे आभार व्यक्त केले.