कोरोना स्फोट – एकाच दिवसात 341 नवे कोरोना रुग्ण………..

279

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

जिल्ह्यात मागील 24 तासात 341 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 265 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 810 झाली आहे. सध्या 2032 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये सरकार नगर चंद्रपूर येथील 72 वर्षीय महिला, बोधली ता. नागभिड येथील 52 वर्षीय पुरूष व आलापल्ली जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 423 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
आज बाधीत आलेल्या 341 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 113, चंद्रपूर तालुका 34, बल्लारपूर 15, भद्रावती 16, ब्रम्हपुरी 10, नागभीड 4, सिंदेवाही 12, मूल 9, सावली 4, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 3, राजूरा 36, चिमूर 4, वरोरा 50, कोरपना 19, जीवती 5 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.