संगमेश्वर पैसा फंडचा दहावीचा निकाल ९९ : २४ टक्के; निकालाची परंपरा कायम

129

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

संगमेश्वर :- संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचा दहावीच्या उज्वल निकालाची परंपरा मुलांनी यावर्षीही कायम राखली आहे . प्रशालेचा एकूण निकाल ९९ : २४ टक्के एवढा लागला आहे . यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष सुधाकर नारकर , उपाध्यक्ष अभय गद्रे , सचिव धनंजय शेट्ये , माजी मुख्याध्यापिका नेहा संसारे , मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर , पर्यवेक्षक सचिनदेव खामकर यांनी अभिनंदन केले आहे . दहावीला एकूण १३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते , त्यातील १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . एक विद्यार्थी प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहीला होता . प्रथम क्रमांक किरण सुभाष डावल ९२:८० , द्वितीय अन्वी मिलींद शेट्ये ९१ , तृतीय प्रशांत राजाराम डिके ९०:८० टक्के . विद्यार्थ्यांनी यावर्षीही दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल प्रशालेचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

दखल न्यूज भारत