विहाराच्या बांधकामासाठी महापरित्राण सुत्तपठाण,धम्मदेसना व संघदान कार्यक्रम संपन्न सामाजिक कार्याबद्दल विवेक बोढे यांचा सत्कार

198

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

शुक्रवार ला घुग्गुस येथील घुग्गुस चंद्रपूर रस्त्यावरील शांतीनगर वार्ड क्र.6 येथे बोधिसत्व बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी”महापरित्राणसुत्तपठाण, धम्मदेसना व संघदान” कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पुज्य.भदंत सुमनवन्नो महास्थवीर विपस्सना आचार्य, पुज्य. भिक्खु सच्चक स्थवीर, पुज्य.भिक्खु संघवंस स्थवीर, पुज्य. भिक्खु आनंद स्थवीर, पुज्य. भिक्खु धम्मप्रकाश संबोधी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विवेक बोढे यांचा धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुष्पगुछ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच घुग्गुस गुरुद्वारा कमेटीचे सरदार संमतसिंग, मशीद कमेटीचे असलम खान, सामाजिक कार्यकर्ते बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, प्रेमदास कांबळे यांच्या पुष्पगुछ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
सायंकाळी 5 वाजता “धम्मदेसना” संसारिक जीवनात सर्व समस्याचे निवारण बुद्धाचे उपदेशाने संभव आहे का.? या विषयावरील कार्यक्रम संपन्न झाला. रात्री 8 वाजता आकाश दिवे उडवून भगवान बुद्धाची पूजा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रत्येक उपासकांनी एक आकाश दिवा उडवून भ.बुद्धाची पूजा करण्यात आली. रात्री 9 वाजता पुज्य. श्रद्धेय भिक्खुसंघ द्वारा “महापरित्राण पाठ” करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भिक्खु रत्नमनी बोधिसत्व बुद्धविहार भिक्खु निवास शांतीनगर घुग्गुस यांनी केले होते.