अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार

0
240

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
आष्टी पासून दोन किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाने चितळास जब्बर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी ७.०० वाजताचे दरम्यान घडली.
आष्टी कडून जाणारे अज्ञात वाहन आलापल्ली जात असताना वनविभागाच्या डेपोजवळ रोडवरून जाणारे चितळ वाहनाच्या समोर आल्याने जोरदार धडक दिल्याने चितळ जागीच ठार झाले.वनविभागाच्या कर्मचारी यांना माहिती होताच त्या चितळास उचलून नेले व त्यास दफन करण्यात आले.अज्ञात वाहनांचा शोध वनकर्मचारी घेत आहेत.