कोंढाळा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश

264

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,गडचिरोली जिल्ह्याचे नेते आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून कोंढाळा येथील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी देसाईगंजच्या विश्राम गृहामध्ये २७ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्ष बळकटीकरण करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे,शासकीय योजना दारोदारी पोहचविणे,शेतकरी बांधवांच्या परिस्थितीचा आढावा घेणे,तरुण वर्गांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व इतर अनेक कार्ये करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कार्यतत्पर असणार असल्याचे पक्ष प्रवेश करतेवेळी उपस्थित बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांना सांगितल्या गेले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य युनूस शेख,जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत,देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष क्षितिज उके, तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे, जिल्हासहसचिव विलास गोटेफोडे,जिल्हा कला व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे जिल्हाध्यक्ष भुवन लिल्हारे,तालुका सोशल मीडिया अध्यक्ष कपिल बोरकर,कुरुड तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुलाराम लाकडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश करतांना पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश करण्यात आला.
पक्ष प्रवेशामध्ये कोंढाळा येथील नामदेव वसाके, गुरुदास बन्सोड,लंकेश्वर बुराडे,ताराचंद मेश्राम, भाऊराव गायकवाड,पंढरी हजारे,महेश दुपारे,वासुदेव बुराडे,शरद गायकवाड,गणेश वसाके,विनोद राऊत,गणेश चौधरी,प्रकाश वनस्कार,शामराव शेंडे,विकास मोहूर्ले,प्रवीण झिलपे,ताराचंद बोरूले,युवराज बेदरे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.