साखरवाही येथील जनता विद्यालयात शिक्षण महर्षी जीवतोडे गुरुजी यांचा स्मृतिदिन संपन्न

155

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

जनता विद्यालय साखरवाही येथे शिक्षणमहर्षी स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना स्मृतिदिन निमित्य अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गुरुजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना मोहन गंधारे सर म्हणाले गुरुजींनी शिक्षण प्रसारासाठी अविरत कार्य केले. त्यांचा जन्म वरोरा तालुक्यातील नंदोरी या गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी नागपूर येथे कृषी शास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण करून चंद्रपूर येथील सिटी हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हा पासून जीवतोडे गुरुजी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा देत जनता विद्यालयाची मुहूर्त मेळली कोठारी या ग्रामीण भागात पहिली शाळा सुरु केली नंतर जनता महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी राजकीय क्षेत्रात काम केले ते जिप सदस्य, पं.स. सभापती ते राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. त्यांनी सहकार चळवळीस गती दिली जीवतोडे गुरुजींनी शेवटच्या श्वासा पर्यंत शिक्षणाचा प्रसार केला असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन गंधारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेक बोढे सर, बंडू बरडे सर, खंगार सर, येडे सर, जेणेकर सर कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.