वणी पोलीस स्टेशन च्या आवारात झाला २२ बेवारस मोटर सायकलींचा लिलाव १ लाख ९७ हजार शासनाच्या तिजोरीत जमा

91

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

पोलीस स्टेशन वणी येथे अनेक वर्षापासुन बेवारस असलेल्या २२ मोटर सायकलिंचा जाहिर लिलाव आज दिनांक २७ मार्च ला सकाळी ११ वाजता करण्यात आला. यावेळी २२ मोटर सायकलींच्या जाहीर लिलावातुन तब्बल १ लाख ९७ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस स्टेशन वणी येथे एकूण २२ बेवारस दुचाकी वाहने अनेक वर्षापासुन उभी होती. सदर बेवारस असलेल्या वाहनांची कायदेशिर कारवाई करून निकाली काढण्याची सुचना पोलिस अधीक्षक मा.दिलीप पाटील भुजबळ यांनी वणी पोलीस स्टेशनला केली होती.
त्यानुषंगाने २२ बेवारस मोटर सायकलींचा लिलाव प्रक्रिया‌ संबंधाने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांची परवानगी घेऊन मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी दि.२१ मार्च ला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता.
सदर वाहना बाबत कोनिही मालकी हक्क सिद्ध केलेला नव्हता, त्यामुळे दि.२७ मार्च ला वणी पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी ११:३० वाजता २२ मोटर सायकलींचा जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत वणी परिसरासह यवतमाळ येथुन एकुण ५२ लोक सहभागी झाले होते. हि लीलाव प्रक्रीया शासनाच्या नियमानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मा.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे,पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात प्रभारी तहसिलदार विवेक पांडे, ठाणेदार वैभव जाधव, सपोनि/ माया चाटसे,पोहवा/सुदर्शन वानोळे,सदाशिव मेघावत, शेखर वांढरे,पोना/अशोक टेकाडे यानी केली.