अखेर त्या बेपत्ता युवकाचा गळफास लावून मृत्युदेह आढळला, पोलिस तपास सुरू

181

 

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील घोंसा येथील प्रफुल्ल जनार्धन बोरवार वय 29 वर्ष यांनी फुलोरा (घोंसा)जंगलात टेंभुर्णीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे आढळुन आले आहे. प्रफुल २५ मार्चला घरून निघून गेला तेव्हापासून त्याचा शोध घेणे सुरू होते. परंतु तो आढळून आला नव्हता, दरम्यान आज दि. २७ मार्च ला हिवरी येथील काही महिला जंगलातील रानमेवा टेंम्बर आणण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रफुल्ल फाशी घेऊन दिसला याची माहिती त्यांनी दिल्यावरून गावातील तरुण व नातेवाईक तसेच पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता सदर घटना वणी ठाण्याअंतर्गत येत असल्याने माजी जि.प.सदस्य दिलीप काकडे यांनीं घटनेची माहिती दिल्यावरून एपीआय घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा सुरू आहे. प्रफुल ने आत्महत्या का केली? यांचे कारण पोलिस तपासात निष्पन्न होईल.