Home गडचिरोली पुसुकपल्ली उमानूर व हरिनगर येथे शुद्ध पाण्याची व्यवस्था करा-भाजप जिल्हा सचिव संदीप...

पुसुकपल्ली उमानूर व हरिनगर येथे शुद्ध पाण्याची व्यवस्था करा-भाजप जिल्हा सचिव संदीप कोरेत खा.अशोक नेते यांना निवेदन..

145

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी उपविभागातील अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली व उमानूर मूलचेरा तालुक्यातील हरिनगर येथील अशुद्ध पाण्यामुळे किडनी व लिव्हर च्या आजाराने थैमान घातले आहे या चालू वर्षात 10 च्या वर नागरिकांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले आहे व काही लोकांवर उपचार सुरू आहे या आजाराचे उपचारासाठी महानगरामध्ये जसे गडचिरोली, चंद्रपूर, नागपुर ,वर्धा अश्या शहरामध्ये जावा लागतो.आणि या आजारावर उपचार महाग असल्यामुळे येथील स्थानिक लोकांना ते न परवडण्यासारखे कारण ते मजुरी करणारे मजुरवर्ग आहे या गंभीर परिस्थिती वर मात करण्यासाठी शुद्ध पाणी हे एकच उपाय आहे या शुद्ध पाण्याची वव्यवस्था लवकर न झाल्यास आणखी लोकांना आपला जीव गमवावा लागेल करिता या परिस्थितीवर मात करण्यासाठी सदर भागात तात्काळ नवीन नळ योजना कार्यान्वित करण्यात यावी म्हणून भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्हा सचिव ना.संदीपभाऊ कोरेत यांनी गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार ना.अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून मागणी केले आहेत.

Previous articleलोणखेडी गावात कृषिमंत्री याच्या उपस्थित महिला शेतीशाळा संपन्न
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार