अचानक कारने घेतला पेट,सुदैवाने जिवित हानी टळली

196

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र
कुरखेडा येथील तहसिल कार्यालय समोर माजी जि प सदस्य अमोल मारकवार यांच्या उभ्या असलेल्या टाटा इंडिको कारने पेट घेतला. ही घट्ना आज दूपारि साडे बाराच्या दरम्यान घटली.सुदैवाने मारकवार कार मधून उतरून समोरील होटेल मध्ये गेले होते.त्या वेळी विज कार्यलयातिल आन्दोलन आटोपून माजी जिल्हाप्रमूख सुरेंदसिंग चंदेल येत असताना कार च्या बोनट मधून धुर निघत कार पेट घेत असल्याचे त्याना दिसताच त्यांनी कार्यकर्त्यासाह समोरच्या होटेल मधून बादलिने पाणी घेऊन आग विझवन्याचा प्रयत्न केला परंतु कार दुसर्या बाजूने पेट घेत होती.त्वरित त्यानी नगर पंचायत च्या अग्निशमन वाहनास पाचारण केले व त्या सहाय्याने आगी वर नियंत्रण करण्यात आले. इतक्या वेळात आगीने कारचे खुप प्रमाणात नुकसान झाले होते.या वेळी विज कार्यालयाच्या आन्दोलन स्थळी बंदोबस्तात असलेले कुरखेडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुधाकर देडे आपल्या ताफ्यासह तिथे पोहोचत परिस्तिती हाताळलि.बघ्यांचि खुप गर्दी जमा झाली होती. आगीचे कारण कळु शकले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.