पिकअप दुचाकीच्या अपघातात युवक जागीच ठार

203

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

गोंडपिपरी:- गोंडपिपरी मार्गावरील वटराणा जवळ आज तीन वाजताचा दरम्यान दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अंकूश हरी नेवारे (२५) असे मृतकाचे नाव आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथिल रहीवाशी असलेला अंकुश आपल्या MH 34 AS-3778 दुचाकीने कामानिमीत्याने तो कुडेनांदगाव येथून गोंडपिपरीला जायला निघाला समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH 31 EN-0395 पीकअपची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकी नियंत्रित न झाल्याने अंकुश कोसळला, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. त्याच्या पच्यात आई-वडील,दोन भाऊ असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मृतदेहाला श्वविच्छेदनाकरीता पाठवले गेले असून पुढील तपास ठाणेदार धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी शंकर मंने, अमित गुरनुले करीत आहे