लोणखेडी गावात कृषिमंत्री याच्या उपस्थित महिला शेतीशाळा संपन्न

 

राजू हालोर  उपसंपादक धुळे दखल न्युज

धुळे ता, 28/07/2020 रोजी लोणखेडी गावात कृषी विभाग महाराष्ट्र शासन व लुपिन ह्यूमन वेलफेअर & रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी शेती शाळेचा चौथा वर्ग आयोजित करण्यात आला होता, सदर शेतीशाळेस महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.श्री. दादाजी दगडू भुसे व साक्री तालुका आमदार सौं मंजुळा ताई गावित यांनी महिला शेती शाळेला भेट दिली त्यात कापूस पिकाची सद्यथिती जाणून घेतली व उपस्थित महिलाकडून मंत्री दादाजी भुसे यांनी मका व कापूस पिकातील एकात्मिक कीड वेवस्थापन मित्र व शत्रू किडीची ओळख व मका पिकावरील लष्करी अळी वरील उपाय योजना या विषयी माहिती जाणून घेतली तसेच सद्यथिती ला परिसरातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या यावेळी उपस्थित शिसेना जिल्हा प्रमुख श्री.हिलाल आणा माळी,श्री.शंकर खलाणे (जि.प.सदस्य नेर) कृषीअधिकारी श्री.विवेक सोनवणे तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे सर ,मंडळ कृषी अधिकारी श्री अमृत पवार, कृषीसह्यायक अमोल पाटील, आर.व्ही.बोरसे,संतोष भदाणे,गणेश बोरसे,अमोल राजपूत,चेतन शिंदे,प्रदीप कापडणे,योगेश महाले,तसेच कुसुंबा बि.सी.आय.प्रकल्प पि.यू. वेवस्थाक श्री. विनोद मासूळे व कृषिमित्र नितीन चौधरी, विकास सिसोदे उपस्थित होते.