रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दंतचिकित्सा व मार्गदर्शन शिबिर संपन्न

102

 

उपसंपादक /अशोक खंडारे

गडचिरोली : अखील भारतीय रिपब्लिकन पक्ष तालुका गडचिरोलीच्या वतीने राखी (गुरवळा) येथे आज सकाळी दंतचिकित्सा व मार्गदर्शन शिबिर आयोजिण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राखी ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कोठारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गडचिरोली येथील प्रसिध्द दंत चिकित्सक डॉ.अंकिता धाकडे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. तर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी, सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, तालुका सचिव विभा उमरे, तालुका अध्यक्ष प्रल्हाद रायपुरे, माजी सरपंच पुरूषोत्तम रामटेके, साखरा येथील सरपंच पुण्यवान सोरते, गुरवळाच्या सरपंच दर्शना भोपये, उपसरपंच प्रकाश बांबाळे, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

या शिबीरात डॉ.अंकीता धाकडे यांनी रूग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले.
प्रल्हाद रायपुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मून रायपुरे यांनी केले.
कार्यक्रमास बाळाजी भांडेकर, शामराव खोब्रागडे व अन्य नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यानी या शिबिरा बद्दल समाधान व्यक्त केले.