घाटकोपर पारसीवाडी येथे महाराष्ट्र युवा सेवा संघाच्या वतीने मोफत ह्रदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

137

 

प्रतिनिधी : बाळू राऊत

घाटकोपर : दि.२७ युवा प्रतिष्ठान (रजि) संचलित महाराष्ट्र युवा सेवा संघ आयोजित शिव जन्मोत्सवानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २७/०३/२०२१ रोजी धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर कळवा यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जय महाराष्ट्र गणेश मैदानजवळील पा.रा.कदम समाजकल्याण हॉल पारसीवाडी घाटकोपर पश्चिम येथे करण्यात आले होते.
त्यावेळी शिवसेनाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते , भाजपा वार्ड क्रमांक १२९ नगरसेवक सूर्यकांत जयहरी गवळी,समाजसेवक भरत मते भाजपाच्या पार्वती शेंडगे, राजेंद्र यादव महाराष्ट्र बँकचे हनुमंत शिंदे, अनिल यादव, साईधाम प्रतिष्ठानचे प्रभाकर देवकर स्वप्निल राणे, नागेश सुलाखे सचिन जाधव, दया औटी,जयद्रथ अहिरे मामा,शेखर गाडेकर, स्वप्निल दिघे,अतूल कोकरे अमित गायकवाड नितीन मोटे, रोहित सिंह, नारायण चव्हाण, मेहुल मोगरे उपस्थित होते
आणि महाराष्ट्र युवा सेवा संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या त्यामधे संपूर्ण शरीर तपासणी ईसीजी, ब्लड प्रेशर, बिपी प्लस, उंची वजन ,रेनडम ब्लड शुगर, वजन तपासणी
शिबिरात अंतर्गत रुग्णालयामध्ये होणार्‍या मोफत तपासणी व शस्त्रक्रिया ईसीजी, 2 डी इको तपासणी, टीएमटी तपासणी, एनजीओग्राफि तपासणी,एनजीओल्फाप्
स्टि, शस्त्रक्रिया, बायपास शस्त्रक्रिया झडप शस्त्रक्रिया आय.ए.बी.पी उपचार, पेसमेकर ,मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार
महाराष्ट्र युवा संघाचे अध्यक्ष सुहास कोल्हे यांनी सांगितले की, शिव जन्मोत्सवाच्या निमित्ताने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
आवाहनाला प्रतिसाद देत
२८/०३/२०२१ रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विभागीय जनतेने जास्तीत जास्त रक्तदान करावे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय जनतेने आणि कार्यकर्ते यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल महाराष्ट्र युवा सेवा संघाचे अध्यक्ष सुहास कोल्हे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले