‘निर्लज्जम सदा सुखी’ कादंबरीचे प्रकाशन संपन्न.

69

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे (प्रतिनिधी): भ्रष्टाचार, बेदरकारी, थापेबाजी, बेमुवर्तखोरी, अरेरावी असे शब्द उफाळून वर यायला लागले की आपसूक सडक्या सिस्टीमची आठवण या शब्दांबरोबर जोडून येते. आजूनही समजामध्ये निर्लज्ज – बेशरम मंडळी खूप प्रमाणात शिल्लक असल्याचे दिसून येते. लेखक अमोल करंबे लिखित आणि लिजेंडरी बुक्स प्रकाशित ‘निर्लज्जम सदा सुखी’ या कादंबरीत असे अनेक किस्से वर्णनात्मक पद्धतीने वाचकांना अंतर्मुख करायला लावतील अशा पद्धतीने लिहीले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी लिजेंडरी प्रकाशनाचे सीईओ कुणाल मराठे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा ऑनलाईन पार पाडण्यात आला.

दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले की, प्रवास, भटकंती आणि फिल्म हे माझे आवडते विषय. त्यातच ही कादंबरी संपूर्ण माझ्या आवडत्या विषयावर लिहली गेली आहे. त्यात डॉक्युमेंटरीमध्ये असणारे कॉलेजच्या आठवणी खूप जवळच्या वाटतात. आणि अर्थातच, कादंबरीचं नाव आणि अमोलने सांगितलेले निर्लज्जांचे दोन प्रकार, त्याचे समाजातील निरीक्षण आणि लेखनातील उत्कृष्ठपणा सांगून जातात, असे प्रतिपादन प्रसिद्ध नॅशनल अवॉर्ड फिल्ममेकर सुजय सुनील डहाके यांनी ‘निर्लज्जम सदा सुखी’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात केले.

फक्त पैसे मिळवणे हे आमच्या प्रकाशन संस्थेचे उद्दिष्ट नाही. त्यामुळेच आमच्या प्रकाशन संस्थेतर्फे दरवर्षी केवळ दर्जेदार, हटके विषय असलेली मोजकी पुस्तके छापली जातात. निर्लज्जम सदा सुखी कादंबरीचा ड्रॅफ्ट आमच्याकडे आला तेव्हा डॉक्युमेंटरी, विदर्भाच्या कुशीतील आणेल ठिकाणांचा उल्लेख वाचला आणि ही कादंबरी नवीन विषय घेऊन आलीय हे कळताच ही कादंबरी प्रकाशित करण्याचे नक्की केले, लिजेंडरी प्रकाशनाचे सीईओ कुणाल मराठे यांनी नमूद केले.

कादंबरीचे लेखक अमोल करंबे म्हणाले, माझा माझ्या मूळ गावावर खूप जीव, विदर्भ परिसर तसा अजून इतर महाराष्ट्रात पूर्णपणे परिचित नाही. या कांदंबरीच्या अनुषंगाने राज्यातील या भागाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावी अशी छुपी इच्छा तर होतीच शिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समाजप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव, समाजात असलेल्या विविध समस्या, अडचणी यांची माहिती देत त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना विचार करायला भाग पडावे असेही वाटत होते.