तोडलेला विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करा, आमदार डॉ परिणय फुके यांचे विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता यांना निर्देश

59

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

भंडारा (२६ मार्च) : भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे थकित असलेले वीज बिलापोटी महावितरण ने वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली असुन यामुळे अनेक गावात अंधार पसरला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा देखील ठप्प झाला आहे. याबाबत आज आमदार डॉ परिणय फुके हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना शहापूर गावाजवळील कवडसी फाट्यावर विद्युत वितरण विभागावर रोष व्यक्त करीत ग्रामस्थ एकत्र आले होते. त्यांची कैफियत आ. फुके यांनी आस्थेने येकूण घेतली व लगेच विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता श्री नाईक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पण तोडगा निघत नसल्याचे पाहून लगेच आ. फुके यांनी जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता व जी. प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित केली. एक वर्षापासुन कोरोना महामारीमुळे ग्रामस्थानकडे पैसा नसल्याने ग्रामपंचायतीकडून वसुली झाली नाही. विद्युत वितरण कंपनीचे बिल ग्रामपंचायतीना अदा करता येऊ शकले नाही अशी गाथा सरपंच यांनी मांडली.
यावर आ. फुके यांनी पाणी व स्ट्रीट लाईट हे दोन्ही नागरिकांच्या मूलभूत गरजा असून सध्या कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता विज खंडित करणे योग्य नसल्याने त्वरित विद्युत पुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिक्षक अभियंता यांना दिले.
आमदार यांचा रोष बघता लगेच अधिक्षक अभियंता यांनी विद्युत विभागाला निर्देश देऊन विद्युत पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली असता विद्युत पुरवठा सुरू झाल्याचे सांगत आ. फुके यांचे मनपुर्वक आभार मानले. त्यामुळे आज “जैसा बोले तैसा चाले” याचा प्रत्यक्षात अनुभव पहावयास मिळाल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले.
यावेळी तालुका अध्यक्ष श्री विनोद बांते, जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रप्रकाश दुरुपकर, जिल्हा परिषद सदस्य श्री प्रेमजी वनवे, पंचायत समिती सदस्य श्री अमित वसानी, महामंत्री श्री विनोद भुरे, नगरसेवक श्री संजय कुंभलकर, श्री बबलु आतिलकर, श्री संदीप भांडारकर, श्री शुभम मेंढे व मोठ्या संख्येनी ग्रामस्थ उपस्थित होते.