भाजपा सहकार आघाडी पुणे यांच्यावतीने मार्केट यार्ड मध्ये कोवीड लसीकरण सुरू करण्यासाठी महापौरांना निवेदन, सचिन दांगट अध्यक्ष सहकार आघाडी भाजप पुणे.

67

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
मार्केटयार्ड मध्ये कोवीड १९ लसीकरण केंद्र सुरु करणे बाबत पुण्यनगरीचे महापौर मा.मुरलीआण्णा मोहोळ यांना सहकार आघाडीचे वतीने पत्र देण्यात आले .
संपुर्ण पुणे शहराच्या रोज मदतीला येणारे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड हे कोरोनाचे महाभयंकर महामारीच्या सुरूवातीपासुन ते आजपर्यंत कार्यरत असणारी सहकारी संस्था आहे . या मार्केटयार्डामध्ये दररोज राज्य आणि परराज्यातुन ३००/४०० वाहनातून मालाची आवक होते .या बाजारात किमान १५ ते २० हजार लोक ये जा करतात .
या सर्व लोकांचे सेवेसाठी असणारे गाळामालक , हमाल , तोलणार , मापणार , वाहतुक व्यवस्थेतील लोक अशी किमान २५ ते ३० हजार लोक रोज कार्यरत असतात . यांच्या संपर्कात रोज हजारो लोक येत असतात .
ज्याप्रमाणे फ्रंट वर्कर्स ह्यांनी आपला जीव धोक्यात घालुन लोकसेवा केली आहे त्याचप्रमाणे मार्केटयार्डातील लोकांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही .
महापौरांनी विशेष लक्ष घालुन जर कोरोना लसीकरण केंद्र जर मार्केटयार्डात सुरू केल्यास येथील सर्व जनसेवक सुरक्षित होतील . आणि पर्यायाने या लोकांचे संपर्क अनेक लोकांशी येत असल्याने त्या लोकांचे आरोग्यही सुरक्षित होऊन जाईल .
याबाबत गांभीर्याने विचार व्हावा ही विनंती सहकार आघाडीचे वतीने महापौरांना करण्यात आली .