यवतमाळ चे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची तडका फडकी बदली, नवे जिल्हाधिकारी ‌म्हणुन अमोल हेडगे यांची नियुक्ती

94

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

यवतमाळ चे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची तडकाफडकी बदली करुन त्यांचे जागी अमरावती जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल हेगडे यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर अमरावतीचे सिईओ अमोल हेगडे यांच्या जागी अविशांत पांडा (भाप्रसे)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज शुक्रवारला सायंकाळी उशिरा यासंबंधी आदेश जारी करण्यात आला असुन अमरावती विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे पदभार सोपवुन नवीन पदाचा कार्यभार एम. देवेंदर सिंह (भापसे)यांच्याकडुन तात्काळ स्विकारावा असे आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची बदली कुठे करण्यात आली याबाबत मात्र गोपनीयता ठेवण्यात आली आहे.