कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आरमोरीत निदर्शने आंदोलन

174

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी…. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावे , शेती मालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्यात यावा , नवीन विजबिल विधेयक रद्द करण्यात यावे. पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ मागे घेण्यात यावे, यासाठी आणि दिल्लीतील शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आरमोरी येथे महाविकास आघाडीतील विविध घटकपक्ष व अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक जुन्या बसस्थानक जवळ निदर्शन आंदोलन करण्यात आले.
निदर्शन आंदोलनात केंद्र सरकारच्या शेतकरी व जणविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केले हे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी गेल्या चार महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे .सरकारने अनेक वेळा चर्चा करूनही शेतकरी विरोधी कायदे रद्द केले नाही, उलट शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार दडपशाही मार्गाचा अवलंब करीत आहे.
केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याने ते रद्द करण्यात यावे, ,शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्यात यावा , नविन विजबिल विधेयक रद्द करण्यात यावे,पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती मागे घेण्यात याव्यात. या व इतर अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने भारत बंद ची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून भाकपा, कांग्रेस , शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा व इतर पक्षाच्या वतीने शुक्रवारी जुन्या बसस्थानाक जवळ निदर्शने आंदोलन करण्यात आले.व मागण्याचे तहसीलदार यांचेमार्फत निवेदन पंतप्रधान याना पाठविण्यात आले.
आंदोलनात भाकपाचे डॉ. महेश कोपुलवार , माजी आ. हरिराम वरखंडे ,तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, माकप चे जिल्हा सचिव अमोल मारकवार, कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी, ,,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजु अंबानी, राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष संदिप ठाकूर, शहरअध्यक्ष अमीन लालानी कांग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष राजु गारोदे, जगदीश मेश्राम, नामदेव सोरते, अशोक वाकडे, चंद्रभान मेश्राम, हेमलता वाघाडे, कल्पना तिजारे ,रोशनी बैस,मेघा मने, सारिका मारबते, नगरसेवक सिंधू कापकर , मयूर वनमाळी, राकेश कापकर, संजय वाकडे, नंदू खान्देशकर, विजय मुर्वतकर, शालीक पत्रे, प्रशांत खोब्रागडे, मीनाक्षी सेलोकर ,विद्या मेश्राम, मिनाक्षी नैताम, आदित्य हेमके, ,गणेश तिजारे, सह विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.