अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

139

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-खल्लार पो स्टे हद्दीतील खानपूर येथील चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैध रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर पकडला असून चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे
काल दि 25 मार्चला रात्री एक वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरचालक अमरदीप डिगांबर खांडेकर हा ट्रॅक्टर क्र 3308 ने चांद्रभागा नदीच्या पात्रातून एक ब्रास अवैध रेती किंमत 5000  वाहून नेत तलाठी निलेश पांडुरंग वानखडे यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता अमरदीप खांडेकर हा ट्रॅक्टर ट्रालीसह पळून गेला
याबाबतची तक्रार तलाठी निलेश वानखडे यांनी खल्लार पो स्टे दाखल केली पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रालीसह ताब्यात घेऊन ट्रॅक्टर चालक अमरदीप खांडेकर विरुध्द कलम 379अन्वये गुन्हा दाखल केला आहे