बोपखेल गाव मध्ये covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्या बाबत आज आयुक्त यांना निवेदन देण्यात आले – भाग्यदेव एकनाथ घुले.

85

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिकेने प्रत्येक गावामध्ये covid-19 लसीकरण केंद्र चालू केले आहेत तरी लसीकरण केंद्रावर ची वाढती गर्दी बघता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बोपखेल गाव याठिकाणी नागरिकांना लस देण्यासाठी सांगवी किंवा भोसरी किंवा दिघी अशा ठिकाणी जावं लागतं आहे. तरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने याठिकाणी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे.बोपखेल गावाच्या पाहिजेल तसा विकास झालेला नाही. कमीत कमी covid-19 सारख्या महामारी च्या काळामध्ये तरी आपण चांगल्या सुविधा द्याव्या अशी अपेक्षा बोपखेल रामनगर गणेश नगर मधील 16 हजार लोकसंख्या मध्ये ज्येष्ठ मंडळी यांना लस घेण्यासाठी लांब अंतर गाठावे लागत आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गावाला सुविधांच्या बाबतीत प्रत्येक वेळी दुजोरा दिला आहे .तरी साथीच्या रोगांमध्ये तरी दया म्हणून आणि म्हणून आपण सहकार्य करावे ही विनंती आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त पाटील साहेबांना करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांमध्ये भाग्यदेव घुले, दत्तात्रय घुले ,नामदेव गोळे ,मारुती मोरे, रोहिदास जोशी, बाळू घुले, अशोक वहिले इत्यादी नागरिक उपस्थित होते.