चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत ईल्लुर येथिल अभिनव उपक्रम

82

आष्टी प्रतिनिधी प्रविण तिवाडे
: तालुक्यातील पहिल्या मुलींच्या अभ्यासिकेचे उद्धघाटन संपन्न. आज दि.24/03/2021 रोज बुधवारला ठीक 12.00 वाजता खास मुलींसाठी विशेष अभ्यासिकेच उद्धघाटन करण्यात आले.. कार्यक्रमाला उद्घाटक श्री तुळशीराम मडावी सरपंच ग्रा. पं. ईल्लुर , विशेष अतिथी श्री रामचंद्र बामणकार उपसरपंच , श्रीमती फुलाबाई भाऊजी मडावी , सौ.सुरेखा कामसेन वनकर,
सौ.मंगला सुनील मडावी,
सौ. कमलाबाई मडावी, श्री संतोष सुकर मडावी,
सौ. गीताताई भगवान बामनकार , श्री आय. एम. बारसागडे सचिव ग्रा. पं. ईल्लुर
व गावातील मोठ्या संख्येने अभ्यासक मुल, मुली उपस्थित होते….4 वर्षापूर्वी ग्राम पंचायत ईल्लुर अंतर्गत मुले व मुलींसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. ती अभ्यासिका सुवेवस्तीत सुरू असून ग्रामपंचायत ईल्लुर एक पाऊल पुढे टाकत मुलींसाठी विशेष अभ्यासिकेच उद्घाटन करण्यात आल्याने सर्वत्र या निर्णयाचे कौतुक केले जात आहे…. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आय. एम. बारसागडे सचिव यांनी केले तर संचालन श्री निलेश वाय. कुंदावार यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील मडावी, अतुल बोरकुटे, रुपेश चांदेकर, सूरज गलबले, अक्षय बोरकुटे, नितेश देठे, जगदीश कपाट, पत्रू सातर, विनायक नारनवरे, अक्षता लांबाडे, निषा कपाट, पल्लवी पातर,मीना पातर , स्नेहल ठाकूर,सानिका दुर्गे,स्नेहा नारनवरे इत्यादींनी सहकार्य केले….