दीपक पवार यांची मुरबाड पंचायत समिती सभापती पदी बिनविरोध निवड!

77

मुरबाड दि.26(सुभाष जाधव) मुरबाड पंचायत समिती पदी नवतरुण दीपक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुरबाड तालुक्यामध्ये कथोरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला असून एका एका वर्षांनी अनेक नवतरुण तरुणांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभापती होण्याचा मान मिळत असून आज मात्र पुन्हा एक या नवतरुण उमेदवारास माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या प्रयत्न मधून माननीय दीपक पवार यांना सभापती होण्याचा मान मिळालेला असून त्यांच्या उमेदवारी अर्ज कोणत्याही सदस्याने विरोध केला नसल्याने मुरबाड पंचायत समितीवर दीपक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे सर्वत्र मुरबाड करांमध्ये व गणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे आजी माजी सभापती उपसभापती व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते